पुण्यात विमान प्रवाशांसाठी लवकरच नवीन टर्मिनल, सोयीसुविधा कशा असणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । पुण्यात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला. (Pune Airport Terminal new building will be 5 lakh square feet)

पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कसं असेल?
# पुण्यातील नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित असेल.

# दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची क्षमता

# गर्दीच्या काळात 2 हजार 300 प्रवाशांना सेवा देता येणार.

# नव्या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोहोचवणारे 5 नवे मार्ग

# 8 स्वयंचलित जिने, 15 लिफ्ट, 34 चेक-इन काऊंटर असतील

# प्रवासी सामान वहन यंत्रणा, 5 कन्व्हेयर बेल्टसह अन्य अद्यावत सुविधा

# नवं टर्मिनल पर्यावरणास अनुकूल असेल

# खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा

# पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था

# अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *