याला म्हणतात नशीबवान ! शेतकऱ्याला दोन वर्षांत सहाव्यांदा सापडला हिरा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । कधी कुणाचं नशीब कसं पालटेल काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील पन्ना जिह्यातील एका शेतकऱयाच्या बाबतीत असंच काहीसं घडत आहे. या शेतकऱयाला गेल्या दोन वर्षांत सहाव्यांदा लाखमोलाचा हिरा सापडला.

शेतकऱयाने मध्य प्रदेश सरकारकडून एक शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या जमिनीच्या खोदकामात शेतकऱयाला 6.47 कॅरेट हिरा सापडला आहे. असं एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहावेळा त्याच्याबाबतीत झालंय. स्थानिक अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार हा हिरा आगामी काळात लिलावात विक्रीसाठी ठेवला जाईल. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसर त्याची किंमत निश्चित केली जाईल. लिलावातून मिळणारी रक्कम शेतकरी आणि त्याचे चार साथीदार वाटून घेऊ शकतील. अंदाजानुसार 6.47 कॅरेटच्या हिऱयाची किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *