महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जाँग उन गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे चर्चेत आला होता. जुलै महिन्यात त्याच्या डोक्याला पट्टी होती आणि काही खूणा दिसत होत्या. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क करण्यात येत होते. आता किम जाँग उनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्याचा लूक बदललेला दिसत आहे. या फोटोमध्ये तो खूप सडपातळ झाल्याचे दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी किम उपचार घेत असल्याच्याही चर्चा होत्या. आता त्याचे वजन कमी झाले किंवा त्याने केले आहे, या चर्चेसह पुन्हा त्याच्या प्रकृतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.