Horoscope : ‘या’ राशींच्या व्यक्तींना आज दिवस यशस्वी राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर ।

मेष : आज खास करून व्यापारी वर्गाला यश मिळेल. धनलाभाचा योग आहे. कार्यक्षेत्रात कोणताच मोठा बदल होणार नाही. उत्साहाने भरलेला असेल दिवस. आरोग्य चांगले राहील .

वृषभ : बुधवार शिक्षा प्राप्तीसाठी चांगला आहे. मेहनतीनुसार यश मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा योग. व्यावसायिकांना दिवस चांगला . आरोग्याकडे लक्ष द्या .

मिथुन : हा दिवस मांगलिक कार्यासाठी शुभ आहे. खूप दिवसांनी आपल्या जवळच्यांना भेटण्याचा योग मिळेल. नवीन कार्याची सुरूवात लाभदायी असेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता .

कर्क : आजचा दिवस शुभ असेल. कामात यश मिळेल. तुमचं कौतुक होईल. आज तब्बेत सांभाळा. नवीन योजना आखाल. व्यवसायात भरभराट होईल . महिलासाठी दगदगीचा दिवस असेल .

सिंह : आज कामाकडे लक्ष द्या. धनलाभ होईल. कुटुंबाच्या तब्बेतीकडे लक्ष द्या. शत्रूंना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. व्यवहार करताना सावधानता बाळगा .प्रयत्न करत रहा यश हमखास मिळणार .

कन्या : व्यापारी वर्गाला धनलाभ प्राप्त होईल. दिलेले पैस परत मिळतील. चतुराईने यश प्राप्त होईल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल . जागेच्या व्यवहारात फायदा होईल.

तूळ : आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्य घडतील. कामाचं कौतुक होईल. जुनी अडकलेली कामे आज मार्गी लागतील , व्यावसायिकांना आज फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या .

वृश्चिक : आज तुम्ही प्रसन्न असाल . रखडलेली काम पूर्ण कराल. आज कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस आहे. दिवस आव्हानात्मक असेल पण यश संपादन कराल .

धनू : आजचा दिवस उत्तम राहिल. व्यापार – व्यवसायात लाभ मिळेल. भाग्य तुमच्यासोबत आहे. प्रत्येक कामात भाग्य तु्म्हाला साथ देईल. आरोग्य उत्तम राहील, दिवस उत्साहपूर्ण असेल.

मकर : चतुराईने आजचा दिवस घालवा. यश मिळेल. अनेक रखडलेल्या योजना पूर्ण होतील. अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील , महिलांसाठी दिवस धावपळीचा असेल . तब्येतीची काळजी घ्या .

कुंभ : व्यवसाय वाढीच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मन प्रसन्न असेल. प्रयन्त कायम ठेवा. जास्त धावपळ करू नका आज यश हमखास मिळणार . आरोग्य उत्तम असेल.

मीन : परिवाराकडून चांगल सुख मिळेल. मांगलिक कार्य घडतील. प्रेम संबंधात यश प्राप्त होईल. व्यावसायिकांना दिवस चांगला आहे. चलबिचल करू नका. निर्णयावर ठाम रहा . शुभम भवतु ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *