महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ सप्टेंबर । सोने दरात (Gold Price Today) आज मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दरही (Silver rates) कमी झाले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं ऑक्टोबर वायदा 130 रुपये म्हणजेच 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 46,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी 257 रुपये जवळपास 0.40 टक्के घसरणीसह 63,926 रुपयांवर आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती गुरुवारी दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या. डॉलरमध्ये आलेली मजबूती आणि अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नामुळे जागतिक आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे सराफा बाजारात परिणाम पाहायला मिळाला.
9 सप्टेंबर रोजी सोने दरात 130 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीची नोंद झाली. याआधारे सोनं आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 9,300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये गोल्ड 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम सर्वोच्च स्तरावर होते. त्यामुळे सध्या सोन्यात गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सोन्याचा दर 60 हजार रुपयांवर पोहोचू शकतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, गुरुवारी सोन्याचा भाव 2,900 रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर गुरुवारी 46,200 रुपयांवर पोहोचला. दिल्लीत आज 22 कॅरेट 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलाकातामध्ये 22 कॅरेटचा भाव 46,650 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चेन्नईत 44,520 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.