महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ सप्टेंबर । टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याचसह 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. यानंतर मात्र भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता पुन्हा एकदा धोनीची टीममध्ये एण्ट्री झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनीचा अनुभव टीम इंडियासाठी उपयोगी ठरणार आहे. धोनीनं 98 आंतरराष्ट्रीय टी 20 आणि 211 आयपीएल साने खेळले आहेत. या सर्व मॅचमध्ये त्यानं विकेट किपिंग केली असून कॅप्टन म्हणूनही त्याला मोठा अनुभव आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये धोनी या अनुभवाच्या जोरावर टीमला चॅम्पियन बनवू शकतो.
आयसीसी स्पर्धेत अनेकदा टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरवर आक्षेप घेण्यात आला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत अनिश्चितता होती. आता बॅटींग ऑर्डरमधील प्रश्नांचं उत्तर धोनी योग्य पद्धतीनं देऊ शकतो.
महेंद्रसिंह धोनीला बॉलर्सचा कॅप्टन म्हणून ओळखलं जातं. धोनीचा सल्ला अनेकदा बॉलर्सच्या उपयोगी ठरला आहे. आगामी वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाची बॉलिंग अधिक भेदक करण्यासाठी धोनीचा सल्ला फायदेशीर ठरणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीनं भक्कम टीमची निवड केली आहे. आता यामधील कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. धोनी, विराट आणि रोहित शर्मा मिळून संतुलित प्लेईंग 11 टीम निवडू शकतात.
धोनीला टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूबद्दल चांगली माहिती आहे. त्यांना मॅच विनर बनवण्यासाठी धोनीचा कानमंत्र फायदेशीर ठरु शकतो. आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्येही धोनीचं हे मॅजिक पाहयला मिळू शकेल.