महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तब्बल महिनाभर पुणे शहरातील करोना संसर्गाचा दर तीन टक्के किंवा त्याहून कमी स्थिरावल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात उत्सवी वातावरण असले तरी सण साजरा करताना महामारीचा विसर पडू देऊ नका. मुखपट्टी, शारीरिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता या निकषांचे कटाक्षाने पालन करूनच गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शहरातील संसर्गाच्या दरात वाढ होऊ नये यासाठी स्वयंशिस्त हवी, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
करोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेचा वेग ओसरल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सातत्याने करोना रुग्णसंख्येच्या वाढीचा दर तीन टक्के किं वा त्याहून कमी राहिल्याचे दिसत आहे.
२ ते ९ सप्टेंबर हा आठवडाही तोच दिलासा कायम ठेवणारा ठरला आहे. मात्र, उत्सव काळानंतर हा दिलासा काळजीमध्ये बदलण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचे आवाहन के ले जात आहे. मार्च २०२० मध्ये पुणे शहरात राज्यातील पहिला करोना संसर्गाचा रुग्ण आढळला. त्यानंतर सातत्याने पुणे शहरातील करोना संसर्ग हे देशातील साथीचे के ंद्रस्थान राहिले.
अशी घ्या काळजी
उत्सवाच्या उत्साहात अनावश्यक गर्दीत जाऊ नका.
घराबाहेर पडताना दुहेरी मुखपट्टी वापरा.
ताप, सर्दी, खोकला यांपैकी लक्षणे असल्यास विलगीकरण करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
लहान मुले, वृद्ध माणसे, गरोदर महिला यांना गर्दीपासून दूर ठेवा.