भारत विरूद्ध इंग्लंड मधील 5वी टेस्ट रद्द होणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याआधी, भारतीय क्रिकेट टीममध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं वाढत असताना शेवटचा सामना रद्द होणार का अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मँचेस्टर टेस्ट सर्व भारतीय खेळाडूंचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर, दोन्ही क्रिकेट मंडळांनी सामना वेळेवर सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांना इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी दरम्यान कोरोना विषाणूची लागण झाली होती. मँचेस्टरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पाचवी टेस्ट होणार का असा प्रश्न होता.

इंडिया टीममध्ये कोरोनाची अनेक प्रकरणं समोर आल्यामुळे सामन्याबाबत अनिश्चितता होती परंतु आता सामना वेळापत्रकानुसार खेळवला जाणार आहे. सध्या, सर्व खेळाडू सध्या त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. सकाळी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली. आता सर्व भारतीय खेळाडूंचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.

वॉकओव्हरमध्ये इंग्लंडला हा सामना देऊन भारताने पराभव स्वीकारला असता आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली असती. परंतु बीसीसीआयने ही ऑफर सरळ नाकारली. जेव्हा ही ऑफर मिळाली तेव्हा बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माशी या विषयावर बोलले. विराट कोहली आणि रोहित शर्माने हे स्पष्टपणे नकार देत कसोटी सामना खेळण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *