महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । गणेशोत्सव महाराष्ट्रात या सणाचं विशेष महत्त्व आहे. कारण राज्यात घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो. शिवाय लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपराही मोठ्या दिमाखात सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाचं सावट या उत्सवावर आहे. त्यामुळे दर वर्षीच्या उत्साहात हा उत्सव साजरा करता येत नाहीये. तरीही भाविकांनी उत्सवात खंड मात्र पाडलेला नाही. निर्बंध पाळून गणेशोत्सव सुरू आहे. यंदाही तो तसाच साजरा केला जाणार आहे.
गणपती घरी असताना त्याची साग्रसंगीत त्रिकाल पूजा (Prayer), उकडीच्या मोदकांचा नैवेद्य, आरत्या, भजन, कीर्तन आदी सेवा केली जाते. अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं. काही ठिकाणी अथर्वशीर्षाची सहस्रावर्तनंही केली जातात. गणराय ही बुद्धीची आणि मनोकामना पूर्ण करणारी देवता आहे. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार गणपतीच्या विशेष मंत्रांचं पठण केल्यास लाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
– आपलं मूल, मग तो मुलगी असो किंवा मुलगी, अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान असावं, असं प्रत्येक आई-वडिलांनाच वाटत असतं. गणपती ही तर बुद्धीची देवता. त्यामुळे गणरायाला साकडं घातलं, तर आपल्याला तेजस्वी अपत्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असं तेजस्वी, प्रखर बुद्धिमान अपत्य प्राप्त होण्यासाठी पुढे दिलेल्या स्तोत्राचं पठण करावं.
ॐ नमोस्तु गणनाथाय, सिद्धिबुद्धि युताय च,
सर्व प्रदाय देहाय पुत्र वृद्धि प्रदाय च
गुरुदराय गरबे गोपुत्रे गुह्यासिताय ते
गोप्याय गोपिता शेष, भुवनाय चिदात्मने
विश्व मूलाय भव्याय, विश्व सृष्टि कराय ते
नमो नमस्ते सत्याय, सत्यपूर्णाय शुंडिने
एकदंताय शुद्धाय सुमुखाय नमो नम:
प्रपन्न जन पालाय, प्रणतार्ति विनाशिने
शरणंभव देवेश संततिं सुदृढ़ां कुरु
भविष्यंति च ये पुत्रा मत्कुले गणनायक:
ते सर्वे तव पूजार्थं निरता: स्युर्वरोमत:
पुत्र प्रदं इदंस्तोत्रं सर्वसिद्धिप्रदायकम्
– गणपतीला विघ्नहर्ता या नावाने ओळखलं जातं. कारण तो सर्व प्रकारच्या विघ्नांचं हरण करतो. विघ्नं दूर करण्याकरिता प्रार्थना करण्यासाठी पुढे दिलेला मंत्र म्हणावा.
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत् क्वचित्
– आपल्या मनात काही विशेष इच्छा असेल, तर तिच्या पूर्तीसाठी गणरायाला वंदन करून पुढचा श्लोक म्हणावा.
ॐ ग्लौम गौरीपुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश
– घरात सुख-शांती नांदण्यासाठी गणरायाच्या आराधनेत पुढचा मंत्र आवर्जून म्हणावा.
ॐ ग्लौं गं गणपतये नम:
– आपल्या कुटुंबात काही अडचणी, भांडणं असतील, तर त्या दूर करण्यासाठी पुढे दिलेले मंत्र म्हणावेत.
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात
गं क्षिप्रप्रसादनाय नम: .
– गणपती ही बुद्धीची देवता आहे हे खरंच; पण आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, चांगली धनप्राप्ती होण्यासाठीही गणरायाला साकडं घातलं जातं. त्यासाठी पुढे दिलेला मंत्र म्हणावा.
ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा
– दीर्घायुष्यप्राप्तीसाठी मंत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये
– धन, विद्या आणि अपत्यसुखाची इच्छा पूर्ण होण्यासाठी मंत्र
विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम्,
पुत्रार्थी लभते पुत्रान्-मोक्षार्थी लभते गतिम्
हे शेवटचे दोन मंत्र ज्या स्तोत्राचा भाग आहेत, ते गणपतीचं स्तोत्र इथे देत आहोत. त्याचं पठण केवळ गणपतीच्या दिवसांतच नव्हे, तर एरव्हीही दररोज केल्यास लाभदायक ठरतं, अशी श्रद्धा आहे.
श्री गणेशाय नमः ।
नारद उवाच
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिद्धये ।।1।।
प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।।2।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्।।3।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।।4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो।।5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्।।6।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशयः।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः।।8।।
इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्।।