‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरण्याची तारीख का पुढे ढकलली गेली? जाणून घ्या.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर परतावा दाखल करण्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आलीय. यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला असला तरी ही तारीख डिसेंबर २०२१ पर्यंत का पुढे ढकलण्यात आली? असा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात आला असेल…

तांत्रिक कारणामुळे निर्णय
आता करदात्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इन्कम टॅक्स रिटर्न जमा करता येणार आहे. याच वर्षात दुसऱ्यांदा सरकारनं ही तारीख पुढे ढकलली आहे. पहिल्यांदा करोनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती मात्र दुसऱ्यांदा तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवर करदात्यांना अनेक अडचणी येत आहे. ७ जून रोजी लॉन्च करण्यात आल्यानंतर या वेबसाईटमध्ये काम करण्यात अनेक अडथळे जाणवत आहेत.

करदात्यांना या अगोदर १५ सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं गरजेचं होतं. मात्र, आता ही तारीख ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *