PM Kisan: या मोबाइल अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळतील 6000 रुपये, पहा काय आहे प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० सप्टेंबर । पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. अलीकडेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला होता. दरम्यान 9.75 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट पाठवले आहेत. ही रक्कम साधारण 19,500 कोटींपेक्षाही जास्त आहे. कोरोना पँडेमिक काळात छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल. याकरता तुम्ही पीएम किसानच्या www.pmkisan.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरून किंवा मोबाइल अ‍ॅपवरून नोंदणी करू शकता. पीएम किसान योजनेच्या सीमा वाढवण्यासाठी एनआयसी (National Informatics Centre) ने मोबाइल अ‍ॅप डेव्हलप आणि डिझाइन केले आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस सीएससी काउंटर (Post Office CSC counters) वरूनही नोंदणी करू शकता.

पीएम शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही Google Play Store वरून PMKisan GOI Mobile App डाउनलोड करूनही नोंदणी करू शकता. ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. आणि या अॅपमध्ये स्थानिक भाषा देखील उपलब्ध आहेत.

 

>>Google play store वरून PMKISAN GoI Mobile App

>> हे अॅप ओपन करून NEW FARMER REGISTRATION वर क्लिक करा

>> यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि यानंतर Continue वर क्लिक करा

>> यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक अकाउंट डिटेल्स, आयएफएससी कोड इत्यादी एंटर करा

>> सबमिट बटणवर क्लिक करून तुमचं पीएम किसा मोबाइल अॅपवर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *