भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट स्थगित! या क्रिकेटपटूनं केलं जाहीर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० सप्टेंबर । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट स्थगित होण्याची चिन्ह आहेत. टीम इंडियाचे ज्युनियर फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ही टेस्ट संकटात सापडली आहे. मँचेस्टर टेस्टमधून भारताने माघार घ्यावी आणि सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवावी, अशी ऑफर इंग्लंडने दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मात्र ही धक्कादायक ऑफर धुडकावून लावली. मात्र आता ही टेस्ट स्थगित झाल्याचं सूचक ट्विट टीम इंडियाचा विकेट किपर -बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यानं केलं आहे.

आज खेळ नाही, ओके टाटा बाय-बाय असं मोजक्या शब्दात कार्तिकनं ट्विट केलं आहे. कार्तिकनं या सीरिजमध्ये कॉमेंट्रीही केली आहे.

टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूनं मॅचच्या दरम्यान कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती आणखी खराब होईल अशी चिंता व्यक्त केली होती. पाच टेस्टच्या या मालिकेत टीम इंडियाकडं 2-1 अशी आघाडी होती. भारतीय टीमनं लॉर्ड्स आणि ओव्हलवर झालेल्या टेस्ट जिंकल्या. तर इंग्लंडनं हेडिंग्ले टेस्टमध्ये विजय मिळवला होता. तर नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *