कंगना रनौतचा ‘थलायवी’ चित्रपट आज होणार प्रदर्शित

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१०सप्टेंबर । कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थलायवी’ आज प्रदर्शित होत आहे. कंगना आणि तिचे चाहते बऱ्याच काळापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते.कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थलायवी’ आज प्रदर्शित होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात आली आहेत, तर महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. परंतु, इतर राज्यांमध्ये फक्त 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिलीय.

दरम्यान, काही राज्यांत ‘नाईट शो’ला देखील बंदी घालण्यात आलीय, त्यामुळे हा चित्रपट फक्त काही मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. यानुसार, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जास्त कमाईची अपेक्षा करू शकत नाही.

जेव्हा या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं, तेव्हा या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 50 लाखांची कमाई केली होती. काही ट्रे़ड विश्लेषकांच्या मते, थलायवी हा एक मोठा चित्रपट आहे, परंतु कमी पडद्यावर रिलीज झाल्यामुळे त्याची कमाई 50 लाखांपेक्षा जास्त होणार नाही, असं त्यांनी सांगितलंय.

तर आणखी काही ट्रे़ड विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तो दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्याला प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देतील. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी 1 कोटीपर्यंत कमाई करु शकतो. तसेच, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने लोक चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकतात.

‘थलायवी’ हा चित्रपट आज तमिळ आणि तेलुगूमध्ये देखील रिलीज होत आहे. या चित्रपटाला विशेषतः तामिळनाडूमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळू शकतो.

काही दिवसांपूर्वी कंगनाने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह उघडण्याचे आवाहन केले होते. कारण, यामुळे चित्रपट आणि नाट्य उद्योगाला तोट्यापासून वाचवलं जाईल, असं तिचं म्हणणं होतं. पण, कंगनाचं ते आवाहन सरकारनं स्वीकारलं नाही. त्यामुळे कंगनानं पुन्हा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. लोकल ट्रेन, रेस्टॉरंट्स आणि ऑफिसेस महाराष्ट्रात खुली आहेत, पण फक्त चित्रपटगृहे बंद आहेत. कोरोना विषाणू फक्त चित्रपटगृहांमध्ये पसरतो का?, असा सवालही तीनं उपस्थित केला होता.

कंगनानं एका मुलाखतीत ‘थलायवी’ला तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचं म्हटलं होतं. वास्तविक, कंगनानं तिच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं की, ‘किती अद्भुत अनुभव आहे. ‘थलायवी’ हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट आहे आणि प्रेक्षकांनाही तो खूप आवडेल, असं तिनं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *