महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ सप्टेंबर । आर्थिक वर्ष 2020-21 साठी आतापर्यंत 1.19 कोटी प्राप्तीकर रिटर्न फाईल दाखल करण्यात आल्या आहेत. प्राप्तीकर विभागानुसार सप्टेंबर 2021 मध्ये आयटीआर फायलिंगचा आकडा वाढत जात 3.2 लाखावर पोहोचला असल्याची माहिती आहे.
प्राप्तीकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून नवीन प्राप्तीकर पोर्टलमध्ये येत असणाऱया समस्यांमधून काहीसा दिलासा मिळत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 करीता 1.19 कोटी प्राप्तीकर रिटर्न भरण्यात आला आहे. यामध्ये नवीन 76.2 लाख करदात्यांनी रिटर्न भरण्यासाठी पोर्टलच्या ऑनलाईन यूटिलिटीचा वापर केला असल्याची माहिती आहे.
सरकारने 7 जून रोजी नवीन प्राप्तीकर पोर्टल सादर केले होते. तेव्हापासून अनेक टप्प्यावर समस्या निर्माण होत आहेत. या कारणास्तव प्राप्तीकर फाईलमधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जात होता. सदरचे पोर्टल हे इन्फोसिसने 4241 कोटी रुपयांमध्ये तयार केले आहे.
8.83 कोटी टॅक्सपेयर्स
सात सप्टेंबरपर्यंत 8.83 कोटी युनीक टॅक्सपेयर्सनी पोर्टलवर लॉग इन केले आहे. सप्टेंबरमध्ये योजनेच्या दरम्यान 15.55 लाख टॅक्सपेयर्सने पोर्टलवर लॉगइन केले होते. आतापर्यंत 94.88 लाखापेक्षा अधिक आयटीआरला ई-व्हेरिफाय करण्यात आले आहेत.