कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होणार ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ सप्टेंबर । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणातील पाणी साठा शंभर टीएमसीच्या वर गेला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारी 2 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करणेत येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणात पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणातील पाणी साठा 100 टीमएमसीच्या वर गेल्यानंतर नंतर धरण व्यवस्थापनानं कोयना पायथा वीजगृहातुन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोयना धरण पूर्ण भरण्याकडे वाटचाल सुरु असून कोयना धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरु करुन 1050 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटांन उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्यानं धरण व्यवस्थापनानं धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फुटानं उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना धरण व्यवस्थापानानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून दुपारी 2 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कराड सांगलीकरांची चिंता वाढणार?
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर कोयना नदीकाठच्या गावांसह कराड आणि सांगलीत देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यात असल्यानं तेथील नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *