ऐन सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । कोरोनाकाळ (coronavirus) मुळे मागील काही दिवसापासून घरगुती गॅस सिलिंडरचे भाव (Prices of gas cylinders) सतत वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे अर्थकारण बिघडले आहे. गॅसचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींसह कुटुंबप्रमुख चिंतेत आहे. सध्या महागाई वाढत आहे. गॅसचे दर गगनाला भिडत आहे. आता कुटुंब कसे चालवायचे आणि उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांना भेडसावत आहे. मोलमजुरी करणारे लोक ही सध्या चिंताक्रांत आहेत.

१ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०. ५ रुपये प्रति सिलिंडर होती. ती आता तब्बल ९०० रुपयांपर्यंत गेली आहेत. कोरोना संकटामुळे आधीच जनता त्रासली आहे. अनेकांचे रोजगार हातातून गेले. त्यातच महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉर्पोरेट युगात गॅस ही अत्यावश्यक व गरजवंत गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *