महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ सप्टेंबर । कोविडचे संकट केरळमध्ये गंभीर बनत असल्याने केरळहून येणारे विद्यार्थी, कर्मचारी तसेच पर्यटकांना पाच दिवस घराबाहेर संस्थेत 5 दिवस क्वारंटाईन राहणे सक्तीचे असेल, असे गोवा सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान,राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवल्याविषयी जारी आदेशात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
केरळशिवाय अन्य राज्यांतून येणाऱ्या लोकांना 72 तासांआधीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवणे सक्तीचे आहे. केरळहून येणाऱ्या लोकांनाही हे सक्तीचे आहेच याशिवाय पाच दिवस क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेगळे राहण्यासाठीची व्यवस्था संबंधित शिक्षण संस्थांचे प्रशासक वा प्राचार्य करतील. कर्मचाऱ्यांना वेगळे राहण्याची व्यवस्था संबंधित कंपनी वा कार्यालये करतील. पाच दिवसांनंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल,असे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.