इटली ; डुकरासारखे तोंड असणारा शार्क जाळय़ात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ सप्टेंबर । इटलीच्या समुद्रात एल्बा आयलँडमध्ये नौदल अधिकाऱयाला सापडलेला मासा पाहून प्रत्येक जण अवाप् झाला आहे. या शार्कचा चेहरा डुकरासारखा दिसत होता. सोशल मीडियावर या डुकरासारखा चेहरा असलेल्या शार्कची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

इटलीचे नौदल अधिकारी अलिकडेच समुद्रात गेले होते. जाळे टाकून ते मासे अडकण्याची प्रतीक्षा करत होते. याचदरम्यान त्यांना जाळय़ात काहीतरी अडकले आहे याची जाणीव झाली. पण जाळय़ात अडकलेली गोष्ट पाहून ते हैराण झाले. त्यांना सापडलेला मासा एखाद्या डुकरासारखा दिसत होता. या शार्कचे नाव एंग्युलर रफशार्क आहे. या शार्कच्या प्रजातीला डुकरासारख्या चेहऱयासाठी ओळखले जाते.

हा रफशार्क समुद्रात 2,300 फूट खोलीवर आढळतो असे सांगण्यात येत. याचे वैज्ञानिक नाव ऑक्सिनॉटस एंट्रीनला आहे. शार्कची ही प्रजाती अत्यंत कमी प्रमाणात आढळते, कारण ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याची आययुसीएनकडून (इंटरनॅशनल युनियन फॉर द कंजर्वेशन ऑफ नेचर) इन्डेजर्डच्या शेणीत नोंद करण्यात आली आहे. या माशाची छायाचित्रे समोर येताच लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *