Jet Airways: ‘जेट एअरवेज’ पुन्हा उड्डाण भरण्यास सज्ज, तारीख ठरली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ सप्टेंबर । जेट एअरवेज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत देशांतर्गत उड्डाणाला सुरुवात करणार आहे. जालान कालरॉक कंसोर्टियमनं (Jalan Kalrock Consortium)याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे. जेट एअरवेजला नवसंजीवनी मिळाली असून लवकरच नवी दिल्ली ते मुंबई अशी पहिली उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा २०२२ सालच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू केली जाऊ शकते. ( Jet Airways to resume domestic flights early 2022 starts hiring process know the Details)

“जेट एअरवेज २.० चं प्रमुख उद्दीष्ट हे Q1-2022 पर्यंत देशांतर्गत सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचं असून २०२२ सालच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा देखील सुरू केल्या जातील. त्यावर वेगानं काम सुरू आहे”, असं जालान कलरॉकचे सदस्य आणि जेट एअरवेजचे कार्यकारी अध्यक्ष मुरारी लाल जालान यांनी सांगितलं आहे.

एअर ऑपरेटर सर्टिफिकेटसह कामकाज सुरू करण्यासाठीची प्रक्रिया याआधीपासूनच सुरू करण्यात आली असून सध्या कंसोर्टियम स्लॉटचं बुकिंग, आवश्यक विमानतळांवरील पायाभूत सुविधा आणि नाइट पार्किंग संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची विमानतळ व्यवस्थापनासोबत चर्चा सुरू आहे, असं जालान कंसोर्टियमच्या सदस्यानं सांगितलं आहे.

कर्जाचं ओझं वाढल्यामुळे जेट एअरवेज कंपनी २०१९ साली बंद झाली होती. जेट एअरवेज कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी लिलाव प्रक्रियेत कार्लरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालान यांच्या कंसोर्टियम कंपनीनं गेल्यावर्षी बोली जिंकली होती. त्यानंतर राष्ट्रीय लॉ ट्रिब्युनलनं नव्या कंपनीला देखील मंजुरी दिली. आता डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालयानंही जून २०२२ सालापासून जेट एअरवेजला स्लॉट देण्याची मंजुरी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *