बाप्पा पावला ; गणपती बाप्पासोबत चुकून साडे पाच तोळ्याच्या सोनाच्या मुकूटाचंही विसर्जन !, 12 तासानंतर सापड्ला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ सप्टेंबर । वसईमध्येही एका कुटुंबाकडून दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. मात्र, विसर्जनानंतर हे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडलं. कारणही तसंच होतं. मात्र, विघ्नहर्त्याने 12 तासांत या कुटुंबाची चिंता दूर केली. (Immersion of gold crown along with Ganapati idol)

त्याचं झालं असं की वसईतील पाटील कुटुंबाच्या दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन शनिवारी झालं. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना चुकून साडे पाच तोळ्याच्या मुकूटाचंही विसर्जन झालं. काही वेळानंतर ही बाब पाटील कुटुंबाच्या लक्षात आली. त्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंब चिंतेत पडलं. मात्र 12 तासांच्या शोधानंतर मुकूट सापडला आणि पाटील कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

वसईमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबानं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. मात्र, घरी सुतक पडल्यामुळे पाटील कुटुंबांने आपल्या पाच दिवसाच्या गणपतीचं दीड दिवसांतच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. विसर्जनावेळी ते गणपतीच्या डोक्यावरील सोन्याचा मुकूट काढायला विसरले. साडे पाच तोळ्याच्या मुकूटासह त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. या मुकूटाची किंमत जवळपास तीन लाख रुपये होती. जवळपास 12 तास या मुकूटाचा शोध घेतल्यानंतर अखेर बाप्पाचा मुकूट सापडला. त्यानंतर पाटील कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *