डिजिटल शिक्षण महत्त्वाचे ; राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । कोरोनाने आपल्याला खूप काही शिकविले. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. बदलत्या काळात डिजिटल शिक्षण महत्त्वाचे आहे, मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणेही गरजेचे आहे. राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यबल गटाच्या शिफारशींचे यावेळी सादरीकरणही झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *