IPL 2021 – नव्या संघांचा लिलाव 17 ऑक्टोबरला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । आगामी 2022 च्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आठऐवजी दहा संघ खेळणार याबाबतची चर्चा बऱयाच दिवसांपासून सुरू होती. आता दोन नवीन आयपीएल संघांचा लिलाव 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे निश्चित झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात दहा संघ भिडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने 31 ऑगस्ट 2021 रोजी दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. यानुसार 2022 मध्ये होणाऱया मेगा लिलावामध्ये दोन नवीन संघांचा समावेश होणार आहे. ज्यांना आयपीएलच्या संघांसाठी लिलावासाठी संघ घ्यायचे आहेत त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत आपली नावे देण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या मनात या प्रक्रियेबाबत कोणतीही शंका असेल त्यांना प्रश्न विचारण्यासाठी 23 सप्टेंबर ही अखेरची तारीख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआयकडे जी लोकं आपली नावे देतील त्यांनाचा या लिलावात सहभागी होता येणार आहे.

आयपीएल संघांच्या संख्येत वाढ होणार असल्याने वेळापत्रकाचा ढाचा बदलावा लागणार आहे. प्रत्येक संघाला 14 किंवा 18 साखळी सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर 7 सामने आणि दूरच्या ठिकाणी 7 सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 7 सामने खेळायला मिळतात. मात्र संघांच्या वाढीमुळे जर प्रत्येक संघाला 18 सामने खेळायचे असतील तर स्पर्धेची वेळ वाढेल. संघांना 2 गटांमध्ये विभागले जाईल. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामन्यांची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

नवे आयपीएल संघ घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना 10 लाख रुपये एवढी अनामत रक्कम बीसीसीआयकडे जमा करावी लागणार आहे. ही रक्कम पुन्हा मिळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांना संघ विकत घ्यायचे आहेत त्यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रे बीसीसीआयकडे पाठवणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर ज्या कंपनींचा टर्नओव्हर 3 हजार कोटी रुपये एवढा आहे त्यांना या लिलावात सहभागी होता येणार आहे. प्रत्येक संघाची किंमत यावेळी किमान 2 हजार कोटी रुपये एवढी असणार आहे. त्यामुळे संघांच्या लिलावासाठी मोठय़ा कंपन्या आणि उद्योगपती पुढे सरसावतील, असे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *