व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य ; सण-सुदीमुळे फुलांचा बाजार ‘फुलला’,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ सप्टेंबर । कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सणामध्ये देखील बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत होता. मात्र, पोळ्यानंतर वातावरण हे बदलले आहे. गणेश उत्सव, महालक्ष्मींच्या आगमण या सणामध्ये बाजारात फुलांची आवक वाढूनही दर हे वाढलेलेच आहेत. साधारण: कोणत्याही मालाची आवक वाढली तर दर हे कमी होतात. मात्र, फुलांची मागणी तर वाढलेली आहेच शिवाच फुलांपासून बनवलेले हारही भाव खात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
कोरानाची दुसरी लाट ही ओसरली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत का होईना बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

गणरायाचे आगमन आणि महालक्ष्मी सणामुळे फुलांचा बाजार चांगलाच फुलल्याचे चित्र आहे. विशेष: चंद्रपूर जिल्ह्यात फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून येथील बाजारपेठेत झेंडू, मोगरा आणि गुलाबच्या फुलाची आवक ही वाढलेली आहे. या दरम्यान, झेंडूची फुले 150 ते 200 रुपये किलो, गुलाबाची फुले ही 600 ते 800 रुपये तर शेवंतीच्या फुलाला 300 ते 400 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला आहे. हे फुलांचे दर असून यापेक्षा अधिकचा दर फुलापासून बनवलेल्या हारांना मिळत आहे. गणेश चतुर्थी दिवशी तर एक गुलाबाचे फुल हे 10 ते 20 रुपयेप्रमाणे विकले जात होते.

सणामध्ये हार आणि फुलांना वेगळे असे महत्व आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींचा वापर हा होतोच. सणासुदीत बाजार पेठेत तर वर्दळ सुरू झाली आहे. बाप्पांच्या आशिर्वादाने आणि लक्ष्मींच्या आगमनामुळे बाजारातील चित्र बदलत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बाजार हा फुललेलाच नव्हता. काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध हे शिथील करण्यात आले आहेत. यातच सण उत्सवाचे दिवस सुरु झाल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. विशेष: फुलांची मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देखील फायदा होणार असल्याचे अतिख शेख यांनी सांगितले.

देशामध्ये तब्बल 65 हजार हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावर फुलाचे उत्पादन हे घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हरियाना या राज्यांचा समावेश आहे. देशात कर्नाटकामध्ये सर्वात जास्त फुलाचे उत्पादन घेतले जाते.

एकीकडे फुलाचे दर तर वाढतच आहेत. पण फुलापासून बनवलले हार आणि गजरे यांनाही चांगला दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मोगरा फुलांचा गजरा हा 15 रुपयांना मिळत होता तोच आता 20 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कामगारांच्या हातालाही काम मिळाले आहे. (Flower prices rise during festival, satisfaction among traders)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *