पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत 2000 ऐवजी आता मोदी सरकार देणार 4 हजार रुपये?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ सप्टेंबर । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाखो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत. अशा मुलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन स्कीम’ सुरू केली आहे. याअंतर्गत मुलांना 2,000 रुपयांचे मानधन मिळते. मात्र आता सरकार ही रक्कम 4000 रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील काही आठवड्यांत यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. (pm cares for children scheme under the pm cares for children scheme instead of 2000 the government will now give 4 thousand rupees)

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना
29 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत अशा मुलांना शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची सुविधा जाहीर केली होती. आता या योजनेअंतर्गत मदतीची रक्कम वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. या योजनेशी संबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने अशा अनाथ मुलांना वेतन वाढवून 4,000 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासह, ते म्हणाले की, येत्या काही आठवड्यांत त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते.

3250 अर्ज प्राप्त
महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारला पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेसाठी आतापर्यंत 467 जिल्ह्यांमधून 3250 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी विविध राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 667 अर्ज मंजूर केले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. म्हणजेच आता सरकारकडे अर्ज येऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *