OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ सप्टेंबर । ओलानं ईलेक्ट्रीक स्कूटरची (OLA Electric Scooter) दोन व्हेरिअंट लाँच केले. मात्र, याची किंमत लाख आणि सव्वा लाखाच्यावर होती. परंतू आता महाराष्ट्रातील आणि केंद्राची सबसिडी लाईव्ह झाली असून ओलाच्या स्कूटरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. (Have you reserved your Ola Scooter? Then brace yourselves for priority purchase on 8th September. To know more)

व्हेरिअंट S1 आणि S1 Pro या दोन स्कूटर ओलाने लाँच केल्या होत्या. एस 1ची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रूपये एवढी ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात सबसिडीनंतर ही किंमत 94,999 रूपये आणि 1,24,999 रूपये एवढी कंपनीने जाहीर केली होती. (How to Purchase Ola Electric Scooter Ola S1. )

परंतू दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दोन्ही स्कूटरमागे ग्राहकांचे जवळपास 25000 रुपये वाचणार आहेत.

नव्या किंमतीनुसार ओलाची महाराष्ट्रातील किंमत ola s1 ची 75099 आणि Ola S1 Pro ची 100149 एवढी झाली आहे. या किंमती देशभरात सर्वात कमी आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील ईव्ही पॉलिसी ही इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक चांगली आहे. (OLA Electric Scooter new Price in Maharashtra EV subsidy live)

सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी…
सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी तुम्हाला आधार, पॅन, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे. जर तुम्ही आधी ईव्हीसाठी सबसिडी घेतली असेल तर तुम्हाला दुसरी सबसिडी दिली जाणार नाही. तुमच्याकडे आधीची ईव्ही असेल तर त्याचे ईन्व्हॉईस सादर करावे लागणार आहे. (Have you reserved your Ola Scooter? Then brace yourselves for priority purchase on 8th September. To know more)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *