‘दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे’च्या कामाचा आढावा घेणार गडकरी ; दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ सप्टेंबर । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. (Gadkari to review progress of Delhi-Mumbai Expressway). गडकरींच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यातील पहिला कार्यक्रम हा आज (16 सप्टेंबर) सकाळी 8 वाजता हरियाणातल्या सोहना या गावात आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमधलं दळवळण सुकर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामाचे 9 मार्च 2019 रोजी भूमिपूजन करण्यात आलं. हा हायवे दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना कव्हर करतो. या हायवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमधील आर्थिक विकासाला चालण्या देण्यात येणार आहे. या हायवेच्या आजूबाजूला असणाऱ्या जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जेन, इंदोर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या शहरातील आर्थिक क्रियांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *