![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । Pan-Aadhar Linking: ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत होती. सरकारने आता आधार-पॅन जोडण्याची मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत सहा महिन्याने वाढवली आहे. आता 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता.
आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बातम्याही दिल्या जात होत्या. मात्र तरीदेखील अनेकांनी लिंक केले नाही. वारंवार सूचना करुनही आधार-पॅन लिंक केलं जात नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे.