टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये ही नावं, हे एकमेव विदेशी खेळाडूचे नाव चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket team) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टी20 वर्ल्ड कपनंतर मुख्य प्रशिक्षक पदक सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) नवा प्रशिक्षक शोधण्याचं काम करत असून यासाठी अनेक दिग्गजांच्या नावांची चर्चा आहे.

या नावांच्या यादीत सर्वात प्रमुख नाव आहे भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याचं. यापूर्वी 2016 साली कुंबळे टीम इंडियाचा कोच होता. पण पुढे जाऊन कर्णधार विराट आणि कुंबळे यांच्यात वाद झाल्यामुळे तो पदावरुन पायउतार झाला. सध्या तो आयपीएलच्या पंजाब किंग्स संघाचा कोच असून त्याचं नाव भारताचा हेड कोच म्हणून चर्चेत आहे.

भारताचा दिग्गज कसोटीपटू वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) हा देखील या शर्यतीत आहे. आतापर्यंत त्याने भारताचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं नसलं तरी बराच काळापासून तो आयपीएलच्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा मेन्टॉर आहे. हैद्राबाद संघाने त्याच्यात कारकिर्दीत 2016 साली जेतेपद पटकावलं. त्यामुळे भारताचा भावी कोच म्हणून लक्ष्मणकडेही पाहिलं जात आहे.

सर्व भारतीय माजी क्रिकेटपटूंची नावं प्रक्षिक्षक पदासाठी चर्चेत असताना एकमेव विदेशी खेळाडू ज्याच नाव चर्चेत आहे, तो म्हणजे श्रीलंकेचा महेला जयवर्धने (Mahela Jaywardhane). आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा कोच असणाऱ्या महेलाचं नाव भारताचा कोच म्हणून चांगलच चर्चेत आहे. त्याच्या कारकिर्दीत मुंबईने उत्तम कामगिरी केल्याने भारतासाठीही त्याला कोच म्हणून निवडलं जाऊ शकतं.

भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag). सेहवागही या पदासाठी अर्ज करु शकतो. भारतीय क्रिकेट इतिहासातील तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्तम फलंदाजी करणाऱ्या सेहवागने आयपीएलच्या पंजाब संघाचा मेन्टॉर म्हणूनही काम पाहिलं आहे.

एक खेळाडू म्हणून दोन कसोटी सामने आणि चार वनडे सामने खेळलेले लालाचंद राजपूत (Lalachand Rajput) यांच नावही चर्चेत आहे. अत्यंत कमी सामने खेळले असले तरी त्यांना भारतीय संघाचा मॅनेजर म्हणून दांडगा अनुभव आहे. 2007 च्या टी20 वर्ल्ड कप वेळीही ते संघासोबत होते. तसेच मुंबई इंडियन्स आणि झिम्बाब्वे या संघाचे कोच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *