महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 10 मे ।
मेष: आज वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नफ्याच्या संधी येतील. व्यवसायात लाभ होईल. आरोग्याबाबत थोडे जागरूक राहा. जोडीदार आणि मुलांना सुखद सहकार्य मिळेल.
वृषभ: आज नशीब तुमची साथ देईल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. दीर्घ काळापासून चालणाऱ्या कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निर्णय येत्या काही दिवसात तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे.
मिथुन: आज काही मोठे काम करायचा आणि प्रवासाचा योग येईल. उत्पन्न योग्य राहील. आपण आपले सहकारी आणि मित्रांचे पूर्ण समर्थन मिळवू शकता. उच्च पदस्थ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील.
कर्क:आज राजकारणात यश मिळवण्याची संधी मिळू शकते. सरकारी सेवेतील उच्चपदस्थ लोकांशी तुमची मैत्री होईल. तुम्ही परोपकारी स्वभावाचे आहात त्यामुळे तुम्ही भल्यासाठी काम कराल. तुम्हाला सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
सिंह: आज पैसे खर्च होणार आहेत. तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही प्रत्येक कार्य सोप्या पद्धतीनं करू शकता. तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल.
कन्या: धन आणि संपत्ती खराब होऊ शकते. कुटुंबात मन प्रसन्न राहील. जोडीदाराकडून सहयोग मिळेल. आज मोठ्यांचा आदर करायला हवा. आजचा दिवस आनंदात जाईल.
तुळ: आज दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले जाईल. तुमच्या बोलण्यात गोडवा असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.
वृश्चिक: आज कोणावरही विश्वास ठेवू नका, तुमची फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद असेल, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल आणि नफ्याचा आनंद कायम राहील.
धनु: आज तुम्ही कामाशी संबंधित नवीन योजना बनवण्यात यशस्वी व्हाल. द्योगपती किंवा अधिकाऱ्यांशी ओळखी होतील. पैशाशी संबंधित बाबींमध्ये चांगली बातमी मिळेल.
मकर: कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. सकारात्मक परिणाम या आठवड्यात दिसून येतील. कोणतंही काम तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकता. वैवाहिक जीवनात सुख निर्माण होईल.
कुंभ: आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळेल. देवावर विश्वास वाढेल कामात चांगला वेळ जाईल. तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ मिळेल.
मीन: आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वडिलांचे आशीर्वाद चांगले राहतील. तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये काही शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.