बाप्पाला निरोप देताना ‘या’ मंत्रांचा करा जप, सदैव राहिल श्रीगणेशाची कृपा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । राज्यासह देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. सध्या बाप्पाच्या भक्तीत लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण तल्लीन आहेत. दहा दिवसांच्या मुक्कामनंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा पार पाडला जातो. उद्या म्हणजेच रविवार (19 सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी (Ganesh Chaturthi 2021) आहे.

उद्या बाप्पाला निरोप देताना बाप्पाची आपल्यावर वर्षभर अखंड कृपा राहो यासाठी प्रार्थना करा. बाप्पाचे विसर्जन करताना काही मंत्रांचा जप केल्याने बाप्पाची विशेष कृपा आपल्यावर कायम राहते. हे विसर्जन मंत्र जाणून घेऊ या.

गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी गणपती प्रतिमेच्या संकल्प मंत्रानंतर पूजा- आरती करा. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कंकू वाहा. गणपती बाप्पासाठी मंत्र बोलताना 21 दूर्वा अर्पण करा. बाप्पाला 21 लाडू अर्पण करा.

– ॐ गणाधिपाय नम:
– ॐ उमापुत्राय नम:
– ॐ विघ्ननाशनाय नम:
– ॐ विनायकाय नम:
– ॐ ईशपुत्राय नम:
– ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
– ॐ एकदन्ताय नम:
– ॐ इभवक्त्राय नम:
– ॐ मूषकवाहनाय नम:
– ॐ कुमारगुरवे नम:

यानंतर श्री गणेश मूर्ती घरातून विसर्जनासाठी घेऊन जाताना आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी परत एकदा आरती करा. गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना या मंत्राचा जप करा

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्.
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *