महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । आरोग्य विभागाकडून 6205 पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी गट ‘क’ करिता 25 सप्टेंबर रोजी व गट ‘ड’ करिता 26 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा होणार होती. मात्र ही परीक्षा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी ज्या कंपनीकडे देण्यात आली होती ती कंपनी प्रक्रिया राबविण्यात अपयशी ठरल्याने ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील परीक्षेची तारीख परीक्षेस बसलेल्या सर्व उमेदवारांना मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. परीक्षेस बसलेल्या अनेक उमेदवारांना आपण राहत असलेल्या जिह्यापासून अन्य जिह्यांत परीक्षा केंद्र येणे तसेच हॉलतिकिटमध्ये त्रुटी असणे असा गोंधळ झाला. परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविलेल्या मे. न्यासा कम्युनिकेशन या कंपनीकडून परीक्षा नियोजित वेळेत पार पाडू शकत नसल्याचे सरकारला कळविण्यात आले. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.