Composite LPG Cylinder: आता LPG सिलेंडर नव्या रुपात; जाणून घ्या, ‘कॉम्पजिट सिलेंडर’चे फायदे काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । इंडियन ऑयलनं ग्राहकांसाठी जबरदस्त भेट आणली आहे. इंडियन ऑयलच्या ग्राहकांना आता नव्या प्रकारच्या LPG सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. या नव्या कॉम्पजिट सिलेंडरचे अनेक फायदे ग्राहकांना होतील. इंडियन ऑयलकडून ग्राहकांच्या सुविधेच्या दृष्टीने हा नवीन प्रोडक्ट आणण्यात आला आहे. पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं.

हा सिलेंडर तीन स्तराने बनवला आहे. यात सर्वात पहिला स्तर हाय डेंसिटी पॉलीइथिलीनचा थर आहे. आतमधील या थरावर पॉलीमरपासून बनलेल्या फायबर ग्लासचा कोट आहे. त्याच्या बाहेरील भाग एचडीपीआयने बनवलेला आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने या सिलेंडरची रचना करण्यात आली आहे. सध्या वापरात असलेला LPG कॉम्पजिट सिलेंडर हा स्टीलपासून बनवलेला आहे. कॉम्पजिट सिलेंडर(Composite LPG Cylinder) हा वजनाला खूप हल्का असतो. स्टील सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडरचं वजन अर्धे असतं.

हा सिलेंडर ट्रांसपेरेंट असतो ज्यामुळे प्रकाशात तुम्ही सहजपणे पाहू शकता की, आतमध्ये किती गॅस शिल्लक आहे. ही सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना पुढील रिफील कधी करायची आहे याचं प्लॅनिंग करता येते. कॉम्पजिट सिलेंडरवर जंकदेखील लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचं नुकसान होत नाही. स्क्रॅच होत नसल्याने सिलेंडर जास्त सुरक्षित आहे. या सिलेंडरची डिझाईन मॉडर्न किचनप्रमाणे बनवण्यात आली आहे.

कुठे मिळतोय सिलेंडर?

कॉम्पजिट सिलेंडर देशातील २८ शहरांमध्ये मिळत आहे. यात अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, बंगळुरु, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोयम्बटूर, दार्जिंलिंग, दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, लुधियाना, म्हैसूर, पटना, रायपूर, रांची, संगळुरु, सूरत, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर, तुमकुर, वाराणसी आणि विशाखापट्टनम याठिकाणी मिळतो. कॉम्पजिट सिलेंडर ५ किलो आणि १० किलो वजनात उपलब्ध आहे. देशातील अन्य शहरात लवकरच हा सिलेंडर पोहचवला जाईल.

नव्या सिलेंडरचा किती येणार खर्च?

कॉम्पजिट सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजेन्सीकडे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करायला लागेल. १० किलो LPG सिलेंडरसाठी ३३५० रुपये तर ५ किलो सिलेंडरसाठी २१५० रुपये जमा करावे लागतील. म्हणजे सहजपणे कॉम्पजिट सिलेंडर घेऊ शकता. विशेष म्हणजे तुमचे जुने सिलेंडर कॉम्पजिट सिलेंडरमध्ये बदलू शकता. जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल तर स्टील सिलेंडर घेऊन एजेन्सीमध्ये जा. त्याठिकाणी जुन्या सिलेंडरसाठी जितके खर्च केलेत ती रक्कम कॉम्पजिट सिलेंडरमधून वजा केली जाते. म्हणजे तुम्ही २ हजार रुपये दिले असतील. तर कॉम्पजिट सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला ३३५०-२००० = १३५० रुपये भरावे लागतील. तर ५ किलो सिलेंडरसाठी २१५०-२००० = १५० रुपये भरावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *