छिंदमला दणका दिल्यानंतर निलेश राणेंनी केले उद्धव ठाकरेंचे अभिनंदन!

Spread the love

महाराष्ट्र-24 -मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणा-या श्रीपाद छिंदमला उद्धव ठाकरे सरकारने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करून दणका दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधन म्हणून ओळखले जाणारे भाजपनेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचे मनापासून अभिनंदन केले आहे.

अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदावर असताना श्रीपाद छिंदमने 2018 मध्ये फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर छिंदमविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. जनक्षोभ पाहून छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता.

राज्य सरकारने छिंदमला दणका देत महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या आरोपाखाली नगरसेवकपद रद्द केले आहे. राज्य सकारच्या याच निर्णयाचे निलेश राणे यांनी ट्विट करुन खूप चांगला निर्णय असल्याचे सांगत अभिनंदन केले आहे. श्रीपाद छिंदमने यानंतर 2018 मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. मात्र असे असूनही श्रीपाद छिंदम अहमनगर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *