महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । प्रतिनिधी:-सलमान मुल्ला । कळंब – केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायदयाविरोधात दि.२७ सप्टेंबर रोजी समस्त शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर पाठींबा दिला आहे .उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील शेतकरी मागील १० महिन्यापासून केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करीत रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. आजपर्यंत ही या कायद्याविरोधात आंदोलनामध्ये १५० वर शेतकरी हुतात्मे झाले आहे.या भांडवलधारी धार्जिन केंद्र सरकार निष्ठूरपणे चुपी बसून आहे.या काळ्या कायद्यान्वये केंद्र सरकारला देशातील शेती व शेतकरी उध्वस्त करून ठराविक व्यापारी व्यक्तींना गडगंज संपत्तीचे मालक करावयाचे धोरण आहे.
केंद्र सरकारच्या या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करून “भारत बंद”या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत आहे . या निवेदनावर शहराध्यक्ष मुसद्दीक काझी,प्रदेश प्रतिनिधी प्रा.डॉ.संजय कांबळे,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के,कार्याध्यक्ष राहुल कसबे,युवक तालुका कार्याध्यक्ष उमेश मडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .