महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता येते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात.
सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.
सीताफळ खाण्याचे फायदे
सीताफळ हे हृदयाचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करते.
सीताफळामधील व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते
टाइप – २ मधुमेहाचा धोका कमी करू शकतो
दररोज एक सीताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांना त्रास कमी होतो.
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सीताफळाचे सेवन उपयुक्त ठरेल
गरोदरपणात दररोज सीताफळ घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका कमी होतो
सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खा
स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम
शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते
हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यास मदत
हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ फायदेशीर आहे.
नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते
शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.
लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर.
कोणी खाऊ नये सीताफळ
ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये
ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये
अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते
बैठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे
सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या
याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात.