Flipkart वर २० हजार च्या आत मिळतोय हा iPhone, असा घेता येईल डीलचा फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । Apple चा iPhone SE स्मार्टफोन 3 ऑक्टोबर Flipkart Big Billion Days आधी 64GB स्टोरेज मॉडेलसह 25,999 रुपये (MRP 39,900 रुपये) सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. मागील वर्षी लाँच झालेलं iPhone SE 128GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांत मिळेल. तर 256GB स्टोरेज मॉडेल 40,999 रुपयांत मिळेल.

विक्री डिल्स सध्याच्या फ्लिपकार्ट कर्टर रेजरचा एक भाग आहे, जो केवळ काही निवडक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर देतो. याच ऑफरमध्ये iPhone SE सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. iPhone SE ची किंमत कमी करण्यासाठी ग्राहक विशिष्ट विक्री ऑफरचा लाभ घेऊ शकतात.ICICI आणि Axis बँक दोन्ही क्रेडिट कार्ड युजर्सला 5000 रुपयांहून अधिकच्या ऑर्डरवर कॅशबॅक रुपात 1500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. जर युजर्स आपला जुना फोन एक्सचेंज करत असतील, तर फ्लिपकार्ट 15000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या फोनच्या एक्सचेंज ऑफरवर वेगवेगळ्या किंमती आहेत. iOS वर चालणारे डिव्हाईस सर्वसाधारणपणे विक्रीनंतर अधिक किंमत मिळवतात. फ्लिपकार्टवर हा फोन ब्लॅक, रेड आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये लिस्ट आहे.

Apple iPhone SE ला 4.7 इंची रेटिना HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन आजही अनेक लोक एका कॉम्पॅक्ट स्मार्टफोन रुपात वापरणं पसंत करतात. डिप्स्लेमध्ये ट्रू टोन फीचर असून, ऑटोमेटिक लायटिंगनुसार अॅडजस्ट करतो. यात डॉल्बी विजन आणि HDR10 कम्पॅटिबिलिटीही मिळते. A13 बायोनिक चिपेसट असून यात डेडिकेटेड 8 कोर न्यूरल इंजिन आहे, जे एका सेकंदात 5 ट्रिलियन ऑपरेशन करतं यात वायरलेस चार्जिंगसह 18W वायर्ड चार्जिंगही मिळतं. iPhone SE लेटेस्ट iOS 15 ला अपडेट करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *