नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा ; 4 ऑक्टोबरला आयोजन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोबर रोजी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी या योजनेंतर्गत हा मेळावा होतोय. सातपूरच्या त्र्यंबकरोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होईल. या मेळाव्यासाठी आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. उमेदवारांनी आपले आधार कार्ड, दहावी, सर्व सत्रांची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सोबत आणाव्यात, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार रमाकांत उनवणे यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वी 27 सप्टेंबर रोजीही नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राकडून दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील उद्योग समूह सहभागी झाले. नाशिकच्या डब्ल्यूएनएस ग्लोबस सर्व्हिसेसमध्ये अप्रेंटिसच्या 10 जागा भरल्या. नाशिकच्याच श्रद्धा मोटर इंडस्ट्री प्लांटमध्ये 2 फीटर, 8 वेल्डर आणि 1 जागा इलेक्ट्रीशियनची जागा भरण्यात आली. तर नाशिकच्याच डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसने बी. कॉम आणि बीबीए उत्तीर्णांच्या 100 आणि एमबीएच्या 100 जागांसाठीची संधी उमेदवारांनी दिली होती.

सातपूरच्या रोजगार मेळाव्याचा अपवाद वगळता इतर रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी मिळवण्यासाठी संबंधित उमेदवाराची सेवायोजन कार्यालयामध्ये नोंदणी असणे गरजेचे आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या वेबपोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर जॉब फेअर टॅबरवर क्लिक करावे. यात NASHIK ONLINE JOB FAIR-6 (2021-22) या भागाची निवड करावी. या भागात उमेदवाराने आपल्या पात्रतेप्रमाणे रिक्त जागांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास 0253-2972121 या क्रमांकावर कार्यालय वेळेत संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *