मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, वीजांच्या कडकडाटासह सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । दोन दिवसांपासून औरंगाबाद शहर (Aurangabad city) आणि परिसरात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र आज 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा ढगांचा ढोल घुमू (Heavy rain in Marathwada) लागल्याचे आवाज येऊ लागले अन् चार वाजता वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद (Khultabad), पैठण (Paithan), कन्नड (Kannad) भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात पावसाचे वातावरण असेच राहिल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

1 ऑक्टोबर- या दिवशी हिंगोली, जालना, औरंगाद, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा 30 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो. महसूल प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात सुमारे 2254 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच याचा अंतिम अहवाल 3000 कोटी रुपयांचा असू शकतो. पहिल्या टप्प्यातील अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी गुरुवारी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *