महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । मराठवाड्यात अतिवृष्टीसह (Heavy rainfall) थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली. मात्र, त्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. त्यातच आता पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (heavy rain prediction) हवामान खात्याने वर्तवला आहे. आधीच शेती संपूर्णपणे पाण्यात वाहून गेली आणि आता पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने यामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
2 ऑक्टोबर
कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
3 ऑक्टोबर
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
4 ऑक्टोबर
कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात 71 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राज्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे.