आरोग्य विषयक ; पोटविकार: वारंवार पोट बिघडते? ‘या ’ सोप्या टीप्समुळे होईल अन्नपचन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑक्टोबर । पचनसंस्था ही शरीरातील महत्त्वाची यंत्रणा आहे. खाल्लेले नीट पचणे आणि शरीराला उर्जा पुरविण्याचे काम ही यंत्रणा करत असते. जर ही पचनसंस्था कमकुवत असेल, खराब असेल तर मात्र आपले आरोग्य बिघडते. पोटविकारांशी आपण लढत राहतो, ॲसिडीटी, बद्धकोष्ट, डोकेदुखी, त्वचारोग, ॲनिमिया, व्हिटॅमिनची कमतरता अशी लक्षणे आढळून येतात.खराब पचनसंस्था अन्न नीट पचन करण्यास असमर्थ असते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आपले आरोग्य नीट रहायचे असेल तर त्यावर उपाय शोधले पाहिजेत.

जेवणानंतर वज्रासनात बसा
अनेकदा दुपारचे जेवण झाले की आपण सोफा, खुर्ची अथवा आरामखुर्चीत बसतो. रात्री जेवल्यानंतर अनेकदा आपण टीव्ही पाहत बसतो किंवा झोपी जातो.
मात्र, पचनसंस्था ( पोटविकार ) बिघडण्यासाठी हे कारणीभूत ठरू शकते.मात्र, तुम्ही जेवणानंतर वज्रासनात बसले पाहिजे. त्यामुळे पोटात रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी ते उपयुक्त आहे. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

दररोज ताक प्या
आपल्या आहारात ताकाचा समावेश असायला हवा. जो व्यक्ती दररोज ताक पितो त्याच्यापासून रोग लांब पळतात. ताक रोग बरे करते आणि पुन्हा ते पोटात शिरू देत नाही. ताक हे मानवासाठी अमृतच मानले जाते. ताक वात, पित्त आणि कफ कमी करते. त्यामुळे जेवणानंतर किमान एक ग्लास ताक पिले पाहिजे.

फळे आणि सुका मेवा भिजवून खा
फळे आणि सुक्या मेव्यात फायटिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. आपल्या आतड्यांसाठी त्यातून पोषक तत्वे शोषून घेणे या ॲसिडमुळे कठीण बनते.
त्यामुळे त्यांना भिजवून खाल्ले पाहिजे. फळे आणि सुका मेवा भिजवून खाल्ल्यामुळे फायटिक ॲसिड बाहेर फेकले जाते. त्यामुळे जेवण पचणे सोपे जाते. तसेच पोषक तत्वे शोषण्यास मदत होते.

कच्चे धान्य, भाज्या खाऊ नका
आपली पचनसंस्था ( पोटविकार ) कमजोर असेल तर आपण नीट शिजलेले जेवण खाल्ले पाहिजे. कच्चे मोड आलेले धान्य, भाज्या खाण्याची अनेकांना सवय असते.मात्र, ते पचविण्यासाठी तुमची पचनसंस्थाही तितकी चांगली असणे गरजेचे आहे.जर तुमच्या पचनसंस्थेतील अग्नि कमी असेल तर कच्चे जेवण ते आणखी कमजोर करू शकते.त्यामुळे पोट नेहमी फुगल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे नेहमी पूर्ण शिजलेले अन्न खावे.

विरुद्ध आहार घेऊ नका
अनेकांना काय खावे आणि काय खाऊ नये याचे भान नसते. थंड गरम आहार एकत्र घेतल्याने पोट बिघडू शकते.तुम्ही विरुद्ध आहार घेत असाल तर तुमचे पोय नक्की बिघडणार. उदा: फळे आणि दूध, मासा आणि दूध, मध आणि गरम पाणी, थंड आणि गरम जेवण एकत्र घेतल्यास आपली पचनसंस्था खराब होऊ शकते. चयापचय क्रिया मंत होत जाते आणि त्यामुळे अन्न पचन होत नाही. त्यामुळे विरुद्ध आहार घेऊ नका.

दरराज पाच हजार पावले चाला
बैठे काम करणाऱ्यांचे पोट वारंवार बिघडत असते. त्यामुळे आपले शरीर हलले नाही तर पचनसस्था कायम बिघडू शकते. यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आपण जर कष्टाचे व्यायम करू शकत नसाल तर किमान पाच हजार पावले तरी दररोज चालले पाहिजे. असे केल्याने तुमची पचनसंस्था चांगली होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *