Horoscope Today | या राशींच्या लोकांचे नशिबाचे दरवाजे उघडणार , आयुष्यात होणार हे बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । 

मेष (Aries) :  आजचा दिवस संमिश्र असा राहिल. कार्यालयात तुम्हाला अपेक्षित असे बदल होतील. महिलांमुळे तुम्हाला लाभ होईल. व्यवसायात विस्तार करण्याची इच्छा होईल. अनुभवी आणि वरिष्ठांच्या सल्लाने कठीण काम सुलभ होईल. 

वृषभ (Tarus) : इतरांना मदक केल्याने तुम्हाला फायदा होईल. नवीन काम सुरु करु शकता. कुटुंबियांच्या समन्वयामुळे तुम्हाला पुढे जाण्याचे धैर्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. राजकीय बाबी निकाली निघतील.

मिथुन (Gemini) :आजचा दिवस अनुकूल राहिल. नफ्याच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. फायनान्सशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नफा होईल. उपजीविकेच्या साधनांमध्ये तुम्हाला मेहनतीचे पूर्ण परिणाम मिळतील. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. 

कर्क (Cancer) : जीवनात पुढे जाण्यासाठीआजचा दिवस सर्वोत्तम आहे. इतरांना मदत करण्याची संधी मिळू शकते. नवीन व्यवाहर व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं निकाली लागतील. विवाहयोग्य लोकांसाठी चांगली स्थळ येण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo) :आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंदर्भात कामाला अधिक महत्त्व द्या.  आवडीच्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. 

कन्या (Virgo) :  आजचा दिवस खूप चांगला जाईल. धनलाभ होईल. व्यावसायाचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. रोजगाराच्या दिशेने प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील . 

 तुळ (Libra) :  व्याप्ती वाढवण्याचा आग्रह धरला पाहिजे, हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी आपले लक्ष गुंतवणुकीशी संबंधित कामात ठेवा. कामात शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केल्याने तोटा होईल. 

वृश्चिक (Scorpio) : दिवस  आर्थिकदृष्ट्या चांगला राहिल. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात नवीन काही करण्यापासून सावध राहा. अपेक्षेप्रमाणे प्रगती न झाल्याने निराशा होऊ शकते. कुटुंबात आनंदी वातावरण तयार होईल. 

धनु (Sagittarius) : आज दिवस  तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. कामाबाबत तुमचा आत्मविश्वास खूप चांगला असेल. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये लाभ मिळत आहेत. कुटुंबात संपत्तीमध्ये वाढ होईल. नोकरीत अधिकार वाढण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरु शकतो. जर तुम्ही गरजूंना मदत केली तर तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील. प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. व्यवसायिकांना व्यवहारासाठी  शहराबाहेर जावे लागू शकते.

कुंभ (Aquarius) :आजचा दिवस  तुमच्यासाठी निश्चित परिणाम आणेल. व्यवसायात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.  साईड इनकमच्या दृष्टीने नवे मार्ग सापडतील. कार्यालयात  बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल.

 मीन (Pisces) :आज  कुटुंबियांना तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी तयार रहा. उत्साहाने व्यवसाया संदर्भातील कामं पूर्ण कराल. आर्थिक  व्यवहारासाठी योग्य वेळ आहे. याने तुम्हाला फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *