महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम ( Instagram), व्हॉट्सअॅप ( WhatsApp) आणि मेसेंजर (Messenger) आता ऑनलाइन सेवा सुरु झाली आहे. रात्री नऊ वाजता बंद पडलेली ही सेवा रात्री चार वाजता सुरु झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गैरसोय झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आज झालेल्या व्यत्ययाबद्दल क्षमस्व. (Sorry) मला माहित आहे की, तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात ते. तुम्ही काळजी असलेल्या लोकांशी जोडलेले राहण्यासाठी, ही सेवा पूर्ववत झाली आहे, अशी पोस्ट झुकरबर्ग यांनी केली आहे.
समाज माध्यम प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झाले होते. (Facebook, Messenger, Instagram and WhatsApp are all down) यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली होती. माफ करा, काहीतरी चुकीचे झाले आहे. आम्ही ही समस्या सोडवण्याची काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असं फेसबुकने आपल्या मॅसेजमध्ये म्हटले होते. दरम्यान, पहाटे चार वाजता मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी गैरसोय झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त करत ही सेवा पूर्वत झाल्याची पोस्ट केली.