उस्मानाबाद:-अतिवृष्टीवाहून गेलेल्या बालाजी कांबळे यांच्या परिवाराला मनसेकडून १०,००० रूपयेची आर्थीक मदत….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । सलमान मुल्ला । उस्मानाबाद । उस्मानाबाद जिल्ह्यात नुकताच प्रचंड मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची नुकसान झालेले आहे.तसेच या पाऊसाने आलेल्या पुरात मौजे इर्ला तालुका उस्मानाबाद तेथील बालाजी वसंत कांबळे हा युवक वाहून गेला.त्याचा जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करून ही पत्ता लागेना.त्याच्या पश्चात त्याचे वृध्द आई वडील असून त्याला दोन लहान मुले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आज दि.२ आक्टोबर रोजी प्रत्यक्ष इर्ला गावी भेट देऊन त्या मयत कांबळे कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी १०,००० रूपयेची आर्थिक मदत केली.यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट,सचिव दादा कांबळे, तालुका अध्यक्ष पाशा शेख, तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, राजकुमार कोरेकर,बाबासाहेब वाघमारे सर ,दत्ता बोदंर,भागवत शिंदे,संजय पवार, रजनीकांत ढवारे,विष्णू पाटील,अक्षय साळवी,उमेश कांबळे इत्यादी उपस्थित होते बाटल्यांपासून दूर राहावे लागेल आणि नैसर्गिक जलसंपदा निवडावी लागेल. कंपन्यांना त्यांचा विद्यमान स्टॉक संपवण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना वेळ दिला जाणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *