Exercise for constipation : पोट साफ न होण्याच्या त्रासाला कंटाळलात? हे व्यायाम प्रकार करून पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । सकाळी-सकाळी पोट साफ होणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. पोट सकाळी नीट साफ झालं नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो, याचा अनुभव बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना अनेकदा आलेला असतो. इतरांनाही तात्कालिक कारणांनी काही वेळा ही अडचण जाणवू शकते. यावर उपाय म्हणून आम्ही तुमच्यासाठी 5 व्यायामाचे प्रकार घेऊन आलो आहोत. यापैकी कोणताही व्यायाम नियमित केल्यानंतर तुमचं पोट व्यवस्थितपणे (best exercise for constipation) साफ होण्यास सुरुवात होईल. जाणून घेऊया हे कोणते व्यायाम प्रकार आहेत.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठीचे व्यायाम प्रकार – Exercise to get relief from constipation

क्रंचेस – Crunches
ओटीपोट आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि अ‌ॅब्स काढण्यासाठी क्रंचेसचा व्यायाम केला जातो. पण जेव्हा हे स्नायू क्रंचेसने बळकट होतात, तेव्हा पचनही वेगानं सुरू होतं. याच्यामुळं सकाळी मलविसर्जन होण्यास कोणतीही अडचण येत नाही.

चालणं – Walking
आपण दिवसभरात अनेक वेळा चालतो. पण चालण्याला आपण कधीच व्यायाम म्हणून बघत नाही. अनेक संशोधनं असं दर्शवतात की, तुम्ही दररोज 30 मिनिटं चालत असाल तर पोटाचे स्नायू मजबूत राहतात. ज्यामुळं आतड्यांची हालचाल सुलभ होते.

सिट-अप एक्सरसाइज – Sit ups
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेबरोबरच गॅसची समस्या असेल तर, सिट-अप एक्सरसाइज नक्की करा. हे काहीसं क्रंचेसच्या व्यायामासारखं आहे. फक्त यात तुम्हाला कंबरेचा खालचा भाग जमिनीवरून उचलून छातीजवळ गुडघे आणावे लागतील.

दोरीच्या उड्या मारणं – Rope Skipping
पाय मजबूत करण्यासाठी दोरीच्या उड्या मारणं हा एक चांगला व्यायाम आहे. हा व्यायाम केवळ आपले पाय मजबूत करत नाही तर, स्टॅमिनाही वाढवतो. यासह कॅलरीजही बर्न होतात. शिवाय, उदरपोकळीचे स्नायू देखील मजबूत झाल्यानं तुमची पचनक्रिया सुधारते. यामुळं बद्धकोष्ठतेची तक्रार कमी होण्यास मदत होते.

सायकल चालवणं – Cycling
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सायकल चालवणं हादेखील एक उत्तम व्यायाम आहे. यात ओटीपोटासह पाय आणि नितंबांचे स्नायू मजबूत होतात. आपण दररोज 15-20 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. हा अगदी सोपा व्यायाम प्रकार असून यामुळं पोट साफ होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *