महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 45,680 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46680 रुपये प्रतितोळा आहे. मंगळवारी ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर सध्या प्रतितोळा 46797 रुपये इतका होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 44,940 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,180 रुपये असेल. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46680 रुपये प्रतितोळा इतका आहे.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.