हे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचे षडयंत्र आहे ? पि.के.महाजन.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हे केंद्र व राज्य सरकार मधील सर्व पक्षातील प्रस्थापित राजकीय नेत्यांनी संघटीत होवून अलिखित करार करून ठरवलेले आहे……नुकत्याच सहा जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आता लक्ष आहे देशातील ओबीसींचे मुळ आरक्षण कायमचच घालवायचे…..ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवायचे कि घालवायचे हे पुर्णपणे ह्या प्रस्थापित नेत्यांवर अवलंबून आहे…..केंद्र सरकार ने हुकूमशहा सारखी वागणूक देवून मात्र देशात लोकशाही आहे म्हणून लंगडी कारणे सांगून सहकार्य करण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि राज्य सरकार तकलादू प्रयत्न करून मार्ग काढीत आहोत असे दाखवीत आहेत……आणि ज्याला आरक्षण पाहीजे त्या स्वार्थी ओबीसी नेत्यांना त्यांचा राजकिय मोह सुटत नाहीहे…..राहील्या ओबीसी समाज संघटना अन्यायाविरुद्ध बोंबलून बोंबलून शांत झालेत जणूकाही त्यांचे कामच संपलय……..ही सर्व परिस्थीती पाहून प्रस्थापित स्वताला उच्चवर्णीय समजणाऱ्या नेत्यांनी तर्क केलाय की ओबीसी काहीच करू शकणार नाही….कारण ओबीसींचे हक्क कोणी हिसकावून घेतले / कब्जा बसवला ना तरी ओबीसींना त्याची चिड येत नाही. राग येत नाही. राग आला तरी तो टिकाऊ नसतोच….उदाहरणार्थ ओबीसीं च्या राजकीय आरक्षणाला बोगस ओबीसींचे ग्रहण लागले आहे…निवडणूका आल्या कि रातोरात बोगस दाखले काढून ओबीसींच्या राजकीय कब्जा बसवतात निवडूण येतात ….सत्तेचीफळे चाखतात…..मुळ ओबीसी फक्तबघत बसतो…… बर हे ओबीसींना खरोखर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची चिंता असती तर ते ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसले असते परंतू तस काहीही दिसत नाही….एवढच काय तर साधे ओबीसी आरक्षण बचाव करण्या साठी निषेध आंदोलनात सुद्धा ते सहभागी होत नाहीत. म्हणून त्यांना बोगस ओबीसी म्हणाव .

…हे सर्व मुळ ओबीसींना माहीत असूनही ते काहीच करू शकत नाहीत…..अशी परिस्थिती आहे………तसच सेम आत्ताही करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातील प्रस्थापित राजकीय नेत्यांचा आहे……पण ह्या वेळेस तस होता कामा नये……..आवाज उठवण्याची हीच एक संधी आहे……माननीय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचना व विचारवंत सन्माननीय प्रा. हरी नरके सर , रावसाहेब सर, उत्तमप कांबळे सर व प्रा. श्रावण देवरे ……सारखे विचारवंत” अतीशय अभ्यास करून….खर काय ते शोधून…जिवाची बाजी लावून पोट तिडकीने सल्ला देत आहेत…सत्य मार्गदर्शन करीत त्या मार्गदर्शनाच्या जोरावर कायदेशीर रित्या लढा उभारायला पाहीजे त्या साठी सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मतमतांतरे व हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन….विचार विनीमय करून फक्त ओबीसींचे संघटण तयार करने गरजेचे आहे…. ओबीसींच्या कल्याणार्थ आत्ताच लढा दिला तर यश प्राप्त होवू शकेल …..गरज पडलीच तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढून व इतर समाज बांधवाना बरोबर घेऊन….राजकीय लढाई लढून आपल्या वर झालेल्या अन्यायाचा हिशोब चुकता केला पाहीजे……तरच भविष्यात ओबीसींना किंमत राहणार आहे….नाहीतर पिढ्यान पिढया मागे मागे फिरण्यात आणि सतरंजी उचलण्यात जातील…..म्हणून ओबीसींनी आत्ताच जागृत होवून लढा दिला पाहीजे…….कारण एकदाचे राजकीय आरक्षण गेले तर ते परत मिळवणे अशक्यप्राय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *