भारताची वर्ल्डकप जर्सी बुधवारी होणार लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या भारत संघाच्या जर्सीचे अनावरण बुधवारी (१३ ऑक्टोबर) केले जाणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे नव्या जर्सीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘ज्या क्षणांची तुम्ही वाट पाहात आहात. १३ ऑक्टोबरला लॉन्च केले जाणार आहे. याबाबत तुम्ही उत्साहित आहात ना!’, अशी पोस्ट बीसीसीआयने केली आहे. टीम इंडिया आतापर्यंत निळ्या रंगाच्या जर्सीत खेळत आली आहे. या जर्सीमुळेत टीम इंडियाला ‘मेन इन ब्लू’ बोलले जाते. भारतीय संघ गेल्यावर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गडद निळ्या रंगाची जर्सी परिधान आहे. ही जर्सी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेपुरता वापरली जाणार होती. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हीच जर्सी वापरण्यात आली, असे बीसीसीआयच्या ट्विटरमध्ये सांगण्यात आले आहे.

टी-ट्वेन्टी विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *