‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोन्याहून पिवळा, जाणून घ्या राशीभविष्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर ।

मेष: (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्या आर्थिक आणि आरोग्यविषयकही असू शकतात. मुलांच्या वागण्या-बोलण्याचा मोठा मनस्ताप होऊ शकतो. संयम ठेवावा लागेल. काही प्रश्न मार्गी लावाल. सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल.  

वृषभ: (Taurus Horoscope)
आज कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल. तुमच्याकडून कारण नसताना समोरच्या व्यक्तीला नुकसान पोहचू शकतं.

मिथुन: (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात योग्य निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तू बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.

कर्क: (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोक आज मोठा करार करू शकतात. कायदेशीर किंवा सामाजिक अडथळे निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल.

सिंह: (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना आज त्यांचे विचार सकारात्मक झाल्याचा अनुभव येईल. इतरांकडून अपेक्षाही वाढू लागतील.मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कन्या: (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या आज संपुष्टात येतील. कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.

तूळ: (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी अतिआत्मविश्वास दाखवू नये. काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. परंतु ते काही काळ त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान, सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल.

वृश्चिक: (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्यविषयक समस्या असेल तर दिवसाची सुरूवात करण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनावर अतिरिक्त ताण जाणवेल. आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील.

धनु: (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. हे लोक खूपच भाग्यवान आहेत. भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पाहा. भावंडांची मदत घ्याल.

मकर: (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना आज काम लवकर उरकवण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. लोक तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करतील. नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.

कुंभ: (Aquarius Horoscope)
गरजूंना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास कुंभ राशीचे लोक आज मागेपुढे पाहणार नाहीत. चुकीच्या लोकांना मदत करू नये, याची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

मीन: (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल. कुटुंबातील सदस्यांचं पाठबळ मिळेल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *