महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली –
दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्रायच्या अहवालानुसार 31 डिसेंबर 2019 पर्यंत सलग दुसऱया महिन्यात मोबाइल सबक्रायबरची संख्या घटली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर या काळात 3.19 कोटी ग्राहक कमी झाले आहेत. तर ऑक्टोबर 2019 मध्ये देशात मोबाइल ग्राहकांची संख्या 96.6 लाखांनी काढली होती.
दोन महिन्यांत व्होडाफोन-आयडियाचे सर्वाधिक 4 कोटी 63 हजार ग्राहक कमी झाले आहेत. दुसरीकडे या दोन महिन्यांत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 56.91 लाखाने वाढली आहे. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या सबक्रायबर मोजणीतील पद्धतीत झालेला बदल हे ग्राहकांची संख्या कमी होण्यामागचे कारण आहे. आम्ही ग्राहक कार्यरत राहण्याचा 120 दिवसांचा नियम बदलून 90 दिकसांचा केला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 या काळात सुमारे 1.88 कोटी मोबाइल ग्राहक शहरांतून कमी झाले आहेत. तर ग्रामीण भागातील ही संख्या 1.3 कोटी आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागातील ग्राहक 2.1 लाखांनी काढले.