महाराष्ट्र 24 – वॉशिंग्टन –
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात झालेल्या स्वागतामुळे पुरते भारावले आहेत. ही आठवण सांगताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड स्तुती केली. नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साऊथ कॅरोलिनामध्ये आयोजित जाहीर सभेत ट्रम्प म्हणाले, मोटेरा स्टेडियममध्ये सव्वा लाख लोकांसमोर बोलल्यानंतर मला आता कधीही गर्दीचे अप्रूप वाटणार नाही.
हे स्टेडियम तिप्पट मोठे आहे आणि तिप्पट लोक या ठिकाणी होते. या सभेत भारत दौऱ्याच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “ते सारे अफलातूनच होते. पंतप्रधान मोदी शानदार माणूस आहे. त्या देशातील लोकांचेही त्यांच्यावर प्रेम आहे.’ गेल्या २४ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी अहमदाबादेत मोटेरा स्टेडियममध्येही पत्नी मेलानियासोबत “नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती.